Droupadi Murmu Speech : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या एका भाषणाची सध्या सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे. सुप्रीम कोर्टाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या लहानपणातील आणि राजकीय कारकिर्दीतील अनेक संघर्षमयी किस्से सांगितले. याशिवाय पदांवर असताना लोकांच्या समस्यांवर कसं काम केलं, याबाबतही राष्ट्रपती मुर्मू यांनी खुलासा केला.