उद्धव ठाकरे यांनी फक्त आता काँग्रेस पक्षाचं संविधान स्वीकारणं एवढंच बाकी राहिलं आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं जादूटोणा केला आहे, त्यामुळंच ते शरद पवार यांच्या बरोबर गेले आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.