मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Rahul Gandhi Video : नरेंद्र मोदी म्हणतात, मला देवानं पाठवलंय, राहुल गांधी काय म्हणाले ऐकाच!

Rahul Gandhi Video : नरेंद्र मोदी म्हणतात, मला देवानं पाठवलंय, राहुल गांधी काय म्हणाले ऐकाच!

May 23, 2024 05:26 PM IST Ganesh Pandurang Kadam
May 23, 2024 05:26 PM IST

Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं राजधानी दिल्लीत घेतलेल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही ठराविक पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीवरून त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी हे सध्या त्यांच्या चमच्यांना मुलाखती देत आहेत. त्यात ते मी जैविक नाही. भारतातील सर्व लोक आणि प्राणी जैविक आहेत, परंतु नरेंद्र मोदी जैविक नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना देवानं पाठवलंय. हे ऐकून त्यांचे चमचे त्यांचं कौतुक करतात, असं राहुल गांधी म्हणाले. हा कसला माणूस देवानं पाठवला आहे. कोविडमुळं लोक मरत असताना देवानं पाठवलेला हा माणूस थाळ्या वाजवायला सांगत होता. मोबाइलचे टॉर्च लावायला सांगत होता. हा देवाने कसला माणूस पाठवला आहे?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp