Raj Thackeray on Narayan Rane : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या तुफानी भाषणात उद्धव ठाकरे व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. नारायण राणे यांनी शिवसेना नेमकी कशा परिस्थितीत सोडली, हेही राज यांनी सांगितलं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडलीच नसती, त्यांना बाहेर पडायला भाग पाडलं गेलं, असा आरोप राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला.