Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन सध्या बीड प्रकरणात तीचं नाव घेणाऱ्या आमदार सुरेश धस आणि तशाच मथळ्यांनी बातम्या करणाऱ्या माध्यमांवर ताशेरे ओढले. यावेळी तिने माध्यमांना आणि राजकीय नेत्यांना खडसावून काही प्रश्न विचारले होते.भाजपा आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत धनंजय मुंडे यांच्याशी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा संबंध जोडल्याने मराठी मनोरंजन विश्वातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. यानंतर सुरेश धस यांनी माफी देखील मागितली. यावर आता प्राजक्ता माळी हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.