Pune railway station video : पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाच्या छतावर एक मनोरुग्ण चढल्यानं प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्वे गाड्यांसाठी असलेल्या विद्युत तारांमुळे आणि खाली पडून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. अखेर त्याला कसेबसे खाली उतरवण्यात आलं. मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक मनोरुग्ण एका रेल्वे गाडीवर चढला होता. त्यावेळी विद्युत तारांचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला होता.अशा मनोरुग्णांना रोखण्यासाठी रेल्वे कडून काय ठोस उपाययोजना केल्या जातात असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे.