Eknath Shinde Speech Video : कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनुक्रमे श्रीकांत शिंदे व कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी आज, १५ मे २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही भाषण झालं. एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण भाषण केवळ मोदीमय होतं. 'मोदी हे जनतेच्या हृदयात आहेत. असा पंतप्रधान याआधी कधी झाला नाही आणि कधी होणार नाही', असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. पंतप्रधान मोदी यांचं राजकीय जीवन हा एक अग्निपथ आहे, असं सांगताना, एकनाथ शिंदे यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळीही बोलून दाखवल्या.