मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह मुंबईतील चार क्रिकेटपटूंचा विधानभवनात होणार खास सन्मान

Video : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह मुंबईतील चार क्रिकेटपटूंचा विधानभवनात होणार खास सन्मान

Jul 04, 2024 03:47 PM IST

Mumbaikar Cricketers to be felicitated at vidhan bhavan : टी-२० विश्वचषक क्रिकेट जिंकून आलेल्या भारतीय क्रिकेटपटूंचं भारतात जोरदार स्वागत होत आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व खेळाडूंची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. मुंबईत आज संध्याकाळी सर्व खेळाडूंची विजयी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर उद्या, ५ जुलै रोजी राज्याच्या विधानभवनात टीम इंडियातील मुंबईकर खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभा अध्यक्षांना त्या संदर्भात विनंती केली होती. अध्यक्षांनी त्यास मान्यता दिली. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चारही खेळाडूंनी प्रताप सरनाईक यांचं आमंत्रण स्वीकारलं आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp