Karale Master dindori speech : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत कराळे मास्तरांचं खणखणीत भाषण झालं. कराळे मास्तरांनी यावेळी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सणसणीत टीका केली.भारतीय जनता पक्षाचं सरकार न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला. हे सांगताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी केलेलं बंड, दीपक मिश्रा यांचं वर्तन, न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू, रंजन गोगोई यांच्यवरील दबाव या सगळ्याची गोष्टच सांगितली.