Karale Master speech at dindori rally : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत कराळे मास्तरांचं खणखणीत भाषण झालं. कराळे मास्तरांनी यावेळी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सणसणीत टीका केली. मोदी सरकारच्या कारभारावर व धोरणांवर कराळे मास्तरांनी आकेडवारीसह हल्ला चढवला. कोणीतरी व्यवस्थेच्या विरोधात बोलावं लागेलच नाही. थिजून मरण्यापेक्षा बंड करून मरणं चांगलं, असंही कराळे मास्तर यावेळी म्हणाले. गद्दारांना मतं देणार की निष्ठावंतांना, असा प्रश्नही कराळे मास्तरांनी जाहीर सभेत केला. नरेंद्र मोदींवर मी चार पुस्तकं लिहू शकतो, इतका त्यांनी देशाचा सत्यानाश केला आहे, असा आरोप कराळे मास्तरांनी केला.