Karale Master Speech Video : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज जाहीर सभा झाली. कराळे मास्तरांनी या सभेला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर व मित्र पक्षांवर कराळे मास्तरांनी टीकेची झोड उठवली. देशाला सध्या खतरनाक लोक लाभले आहेत. मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून गुजरातचे पंतप्रधान आहेत, अशी खोचक टीका कराळे मास्तरांनी केली. काँग्रेसनं ७० वर्षांत काय दिलं असं विचारणाऱ्या मोदींना कराळे मास्तरांनी जोरदार उत्तर दिलं. मास्तरांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.