Jitendra Awhad on Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर आमदार सुरेश धस हे वाल्मिक कराडवर करत असलेले सगळे आरोप खरे आहेत. बीडमध्ये गेल्या १० वर्षांत झालेल्या खुनांपैकी ८० टक्के खून हे वाल्मिक कराडनं प्लानिंग करून केलेले आहेत. तो विकृत आहे. तो सायकोपाथ आहे, तो सीरियल किलर आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.