Naseem Khan Video : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी एकाही जागेवर अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार नसल्यामुळं मुस्लिम समजाता संताप आहे. काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आजवर काँग्रेसनं प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. मग यावेळी अल्पसंख्याक समाजातील उमेदवार नसण्याचं कारण काय आहे?...मी प्रचारासाठी लोकांकडे गेलो तर ते प्रश्न विचारतील आणि माझ्याकडे उत्तरं नाहीत. त्यामुळं मी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचा प्रचार करणार नाही. मी स्वत: नाराज आहे. माझ्या आणि लोकांच्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत, असं प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी दिली आहे.