उन्हाळा सुरु झाल्यापासून बरेच पालक आपल्या मुलांना पोटात दुखणे, ताप येणे ,लघवीच्या जागी जळजळ, जेवण न जाणे, खुप तहान लागणे अशा तक्रारी घेऊन दावाखान्यात जातात. ही सर्वच लक्षणे उष्माघाताची सुरुवातीची लक्षणे असून याकरिता उघड्यावरच्या अन्नाचे सेवन टाळणे, बर्फ घातलेली पेय, शीतपेयांचे सेवन टाळणे तसेच आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने, द्रव पदार्थ, भाज्या आणि फळांचा समावेश करावा. उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना सुती कपडे घालायला विसरु नका. पोहायला जाताना सनस्क्रिनचा वापर करा. जेणेकरुन मुलांच्या त्वचेचे नुकसान होणार नाही.