konkan graduate constituency election : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ठाण्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचं कौतुक करताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराची नावावरून खिल्ली उडवली. कोण आहे रमेश कीर? कधी नावही ऐकलं नाही. उमेदवारच माहीत नाही त्यामुळं डावखरे यांचा विजय पक्का आहे. लोक म्हणतील कशाला हवी ती कीर-कीर, असं एकनाथ शिंदे म्हणाले.