Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ओडिशातील पुरी इथं जाऊन भगवान जगन्नाथाचं दर्शन घेतलं. जवळपास दोन किलोमीटर अंतर पायी चालत त्या मंदिरात पोहोचल्या. दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांनी यावेळी मुर्मू यांचं जोरदार स्वागत केलं व हात उंचावून त्यांना अभिवादन केलं. मुर्मू यांनी देखील हात जोडून भाविकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. यावेळी 'जय जगन्नाथ'च्या घोषानं मंदिर परिसर दणाणून गेला होता.