shatrughan sinha video : ज्येष्ठ अभिनेते व आसनसोल लोकसभा मतदारसंघातील टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी इंडिया आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे. ही 'मुद्दा' विरुद्ध मोदी अशी लढाई आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेली कोणतीही गॅरंटी आतापर्यंत पू्र्ण केली नाही. त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळं या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना १५० ते २०० जागा मिळतील. एनडीए खामोश होऊन जाईल, असं ते म्हणाले.