Kolhapur Ganpati Immersion: कोल्हापुरात नद्या व विहिरींतील पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी गणपती विसर्जन कृत्रिम कुंडांमध्ये केले जाते. कोल्हापूरकरांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. कृत्रिम कुंडात विसर्जन झालेल्या सर्व गणेश मूर्तींचं पुनर्विसर्जन इराणी खण क्र. २ इथं केलं जातं. यंदा देखील घरगुती गणेश मूर्तींचं अशाच पद्धतीनं विसर्जन केलं गेलं. यंदाचं वेगळेपण म्हणजे पारंपरिक विसर्जन पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. स्वयंचलित यंत्राच्या मदतीनं अत्यंत शिस्तबद्धरित्या हे विसर्जन पार पडलं. हा विसर्जन सोहळा दृष्ट लागण्याजोगा होता.