Congress vs BJP on social Media : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धडाका उडवून दिला होता. बहुतेक टीव्ही चॅनेलवर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते झळकत होते. मात्र, सोशल मीडियावर चित्र काहीसं वेगळंच होतं. यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सर्व प्लॅटफॉर्म्सवर काँग्रेसचा बोलबाला होता. सोशल मीडियातील आकडेवारीनुसार, भाजपपेक्षा काँग्रेसच्या पोस्टना जास्त लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ही आकडेवारी दिली आहे. लोक काय ऐकत होते, कोणाचं ऐकायचं होतं, कोणत्या मुद्द्यांनी ते प्रभावित झाल होते हे यातून दिसून येत असल्याचं श्रीनेत म्हणाल्या.