Aaditya thackeray video : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला. इथं शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांचा विजय झाला. मात्र या निकालाला ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. या विरोधात त्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवन इथं पत्रकार परिषद झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपनं लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या २४० जागा ह्या गडबड-घोटाळा करून मिळवल्या आहेत. ही निवडणूक निष्पक्ष झाली असती तर भाजपला देशात ४० जागाही मिळाल्या नसत्या, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.