भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून बारामतीवर लक्ष केंद्रित केलं आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून प्रदेशाध्यक्षांपर्यंतचे नेते बारामतीचे दौरे करत आहेत. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला टोला हाणला होता. त्यांच्या टीकेला भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. 'आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजित पवारांमध्ये नाही. त्यामुळं त्यांनी आव्हानाची भाषा करू नये, असं बावनकुळे यांनी सुनावलं आहे.