मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी तपासली मुस्लिम मतदारांची ओळखपत्रे, गुन्हा दाखल

Video : भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी तपासली मुस्लिम मतदारांची ओळखपत्रे, गुन्हा दाखल

May 13, 2024 06:39 PM IST Ganesh Pandurang Kadam
May 13, 2024 06:39 PM IST

Madhavi Latha at Polling Booth : हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या माधवी लता यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. माधवी लता या मतदान केंद्रावर जाऊन मुस्लिम महिला मतदारांचे बुरखे काढायला लावून त्यांची ओळखपत्रं तपासत असल्याचं समोर आलं आहे. माधवी लता यांच्या या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. हैदराबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून माधवी लता यांच्यावर मलकपेट पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. लता यांच्या विरोधात भादंवि कलम १७१ सी, १८६, ५०५ (१) (सी) आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १३२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp