video : नरेंद्र मोदी म्हणतात, केजरीवाल हे अनुभवी चोर! केजरीवालांनी दिलं सणसणीत उत्तर
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : नरेंद्र मोदी म्हणतात, केजरीवाल हे अनुभवी चोर! केजरीवालांनी दिलं सणसणीत उत्तर

video : नरेंद्र मोदी म्हणतात, केजरीवाल हे अनुभवी चोर! केजरीवालांनी दिलं सणसणीत उत्तर

May 24, 2024 08:29 PM IST

arvind kejriwal reply to narendra modi : दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात जुंपली आहे. मद्य घोटाळा हा बनावट असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. मोदी आमच्यावर आधी १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत होते, आता म्हणतात ११०० कोटींचा घोटाळा झाला. जर घोटाळा झाला असेल तर तुम्हाला आमच्याकडं काहीच कसं सापडत नाही? आमच्यावर ५०० छापे टाकले. तुम्हाला पैसे, जमीन, सोनं-नाणं काहीच मिळालं नाही. तुमची सीबीआय आणि अधिकारी इतके कुचकामी आहेत का? असा सवाल केजरीवाल यांनी केला. काहीच मिळालं नाही ही कबुली तुम्ही दिलीच आहे तर आता ह्या अटका आणि चौकशा बंद करा, असं आवाहन केजरीवाल यांनी मोदींना केलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp