anna hazare video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी अण्णा हजारे व खैरनार यांना टोला हाणला होता. माझ्यावर अनेक आरोप करणारे अण्णा हजारे व खैरनार कुठं आहेत? आता त्यांचा थांगपत्ताही नाही, असं पवार म्हणाले होते. त्या टीकेला अण्णा हजारे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना उत्तर दिलं. शरद पवारांना इतक्या वर्षांनंतर अचानक जाग का आली, असं अण्णा हजारे म्हणाले. मी भाजपच्या विरोधात आंदोलन करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मी समाजासाठी नेहमी बोलतो.भाजपच्या विरुद्धही आंदोलनं केली आहेत. माझं चारित्र्य शुद्ध आहे. आचार, विचार शुद्ध आहेत. कुठंही डाग नाही, असं सर्टिफिकेट अण्णा हजारे यांनी स्वत:च स्वत:ला दिलं.