Ajit Pawar Video : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी नुकतीच दौंड येथील वाखरी इथं सभा घेतली. २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीच्या आधी काय-काय राजकारण घडलं होतं याचा सगळा लेखाजोखा अजित पवार यांनी यावेळी मांडला. शरद पवार यांच्या संमतीनंच त्यावेळी सर्व काही झालं होतं. राष्ट्रपती राजवटही आमच्याच सांगण्यावरून उठवण्यात आली होती. मात्र, नंतर काय झालं माहीत नाही, असं अजित पवार म्हणाले. तो शपथविधी पहाटे झाला नव्हता, सकाळी ८ वाजता झाला होता, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.