ajit pawar on baramati lok sabha election result : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता प्रत्येक पक्षानं विश्लेषण सुरू केलं आहे. निवडणुकीत पानिपत झालेल्या अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक या संदर्भात पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बारामतीच्या निकालाचा त्यांना मोठा धक्का बसल्याचं यावेळी जाणवलं. बारामतीमध्ये असा निकाल कसा लागला याचं मला आश्चर्य आहे, असं ते म्हणाले. आता महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील काळात चुका दुरुस्त करू, असंही ते म्हणाले.