Nilesh Lanke Speech Video : अहमदनगर (अहिल्यानगर) लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांनी सारोळ स्टेशन इथं प्रचारसभा घेतली. यावेळी लंके यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. इतकी वर्षे सत्ता भोगूनही वडिलांनी आणि मुलांनी काहीही केलं नाही. दुग्धविकास मंत्री असूनही दुधाला भाव मिळत नाही. त्यामुळं त्यांच्या वडिलांना तोंड बारीक करून फिरण्याची वेळ आली आहे, असं लंके म्हणाले. 'मी लोकांच्या हक्काचा माणूस आहे. मला कुणीही पीए नाही. माझा फोन मीच उचलतो. कुणीही माझ्याशी थेट बोलू शकतो. त्यांच्याकडं तसं नाही. आपला तो आपला असतो हे लक्षात ठेवा, असं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं.