Asim Sarode Slams Narendra Modi : महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी नुकतंच भाषण केलं. सरोदे यांनी देशातील वास्तव मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी हे स्वत:ची तुलना पंडित नेहरू यांच्याशी करायचा प्रयत्न करतात. त्यांना कॉपी करतात. पंडित नेहरू तासन् तास काम करायचे हे समजल्यावर आरएसएसनंही तसाच प्रचार सुरू केला. मोदी हे फक्त दोन-तीन तास झोपतात अशी एक चर्चा घडवून आणली गेली. पण एखादा व्यक्ती नीट झोपत नसेल तर हा मानसिक आजार आहे. जो झोपत नाही त्याची निर्णयक्षमता कमी असते. तो माणूस रागीट, चिडचिडा होतो. या निवडणुकीत भाजपचा पराभव करून मोदींना झोपण्याची परवानगी द्या, असं आवाहन सरोदे यांनी केलं.