Kiran Mane speech : महाविकास आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी राम गणेश गडकरी चौकात झालेल्या सभेला अभिनेते किरण माने यांनी संबोधित केलं. माने यांनी आपल्या बेधडक शैलीत विरोधकांवर टीकेची झोड उठवली. तुम्ही निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीनं तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तमाम महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय. ठाणेकरांना तो कलंक पुसून टाकायचा आहे. ठाणेकरांच्या बाणेदारपणावर, संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. तो डाग आपल्याला पुसून टाकायचा आहे,' असं आवाहन किरण माने यांनी यावेळी केलं. गद्दार जेव्हा रात्री अंधारात सुरतला पळून गेले ती रात्र विसरू नका. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी एका क्षणात वर्षा बंगला सोडला, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते. त्या अश्रूंना आपल्याला न्याय द्यायचा आहे, असं किरण माने म्हणाले.