Aditya Thackeray Video : शिवसेना भवन इथं सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ते विकासाच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा पुनरुच्चार केला. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात पत्र लिहिलं असून सहा हजार कोटींच्या रस्ते विकासाबाबत दहा प्रश्न विचारले आहेत. आदित्य ठाकरे यांनी पत्र महापालिकेला लिहिलेलं असलं तरी त्यांचा रोख थेट शिंदे-फडणवीस सरकारकडं आहे.