Varsha Gaikwad Speech In Maharashtra Assembly Monsoon Session : महाराष्ट्र शासनाची अधिकृत मालकी असलेल्या बालभारतीचे डोमेन दोन हजार यूएस डॉलर्समध्ये विकणे आहे, अशी जाहिरात गूगलवर झळकल्याची घटना समोर आली आहे. त्यावरून काँग्रेसच्या आमदार आणि माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या विधानसभेत चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बालभारतीचं डोमेन विक्रीसाठी जाहिरात येणं ही फसवणुकीची किंवा हॅकिंगची घटना आहे का?, असा सवाल करत वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.