Urfi Javed: आपल्या अतरंगी फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर खळबळ उडवणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर, नेहमीच कपड्यांवरून ट्रोल होणारी उर्फी जावेद, यावेळी जेव्हा मीडियासमोर आली तेव्हा तिला पाहून साऱ्यांचेच डोळे दिपले. उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती शॉर्ट ड्रेस नव्हे, तर संपूर्ण अंग झाकणारा पाकिस्तानी सूट घालून कारमधून खाली उतरताना दिसली आहे. तिचं हे रूप पाहून सगळेच हैराण झाले आहेत.