Urfi Javed: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आता अनेकांच्या निशाण्यावर येत असते. मात्र, उर्फी प्रत्येकालाच आपल्या हटके अंदाजात उत्तर देत आहे. नेहमीच अंगप्रदर्शन करण्याऱ्या उर्फीने यावेळी आपल्या आऊटफिटला हटके लूक दिला आहे. नुकतीच अभिनेत्री मुंबईत स्पॉट झाली होती. यावेळी तिने असा आऊटफिट परिधान केला होता, जो पाहून सगळ्यांनाच कोरोनाची आठवण आली. बॅगी पँटसोबत उर्फी जावेदने ‘कोरोना’ विषाणूसारखी डिझाईन असलेला टॉप परिधान केला होता.