Urfi Javed: सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या भन्नाट लूकसह पापाराझींसाठी पोज देताना दिसली आहे. या लूकमुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. उर्फी जावेदने नुकतीच मुंबईतील एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये उर्फी जावेद हिचा अतिशय बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे. या लूकने तिने सगळ्यांनाच हैराण केले आहे. या इव्हेंटमध्ये उर्फी जावेद गुलाबी रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये दिसली आहे. तिने अर्धेच शरीर झाकणारा ड्रेस परिधान केला आहे. या अतिशय बोल्ड लूकमुळे अभिनेत्री आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.