Urfi Javed: सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या भन्नाट लूकसह पापाराझींसाठी पोज देताना दिसली. यादरम्यान उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. उर्फी जावेदने नुकतीच एका बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये उर्फी जावेद एका पांढऱ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने केवळ दोन हृदयाच्या आकाराने स्वतःचे शरीर झाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर, डोकं मात्र संपूर्ण ओढणीने झाकलं आहे. या लूकमुळे अभिनेत्री ट्रोल होत आहे.