टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. ती तिच्या अतरंगी फॅशनने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच उर्फीने डिझाइन केलेल्या ड्रेसची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तिने लॅपटॉप बॅगपासून भन्नाट ड्रेस बनवला आहे. तिची ही क्रिएटीविटी पाहून नेटकरी फिदा झाले आहेत. एका यूजरने तर "एवढं क्रिएटिव्ह कोणी नाही" असे म्हणत उर्फीचे कौतुक केले आहे.