Urfi Javed: आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. उर्फीला लाईम लाईटमध्ये राहायला खूप आवडतं. नेहमीच तिच्या आजूबाजूला पापाराझींची खूप गर्दी असते. मात्र, यावेळेस उर्फी पापाराझींवर वैतागली आहे. नुकतीच उर्फी मुंबईत स्पॉट झाली. यावेळी गाडीतून उतरत असताना तिच्या आजूबाजूला पापाराझींची मोठी गर्दी जामली. यातच उर्फीलाही थोडासा धक्का लागला. यावेळी मात्र, उर्फीने सगळ्यांना मागे उभं राहायला सांगितलं. तर, पापाराझींमध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्याची देखील तिने विचारपूर केली. मी सगळ्यांशी बोलतेच तरी का अशी धक्काबुक्की करताय असा सवाल तिने उपस्थित केला.