Urfi Javed: मणिपूरमध्ये दोन महिलांसोबत झालेल्या लाजिरवाण्या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेने खरोखरच माणुसकीला काळीमा फासला आहे. सोशल मीडियापासून ते आता लोक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत. याप्रकरणी संताप व्यक्त करण्यासोबतच दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वजण करत आहेत. मणिपूरच्या घटनेवर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. अशा परिस्थितीत आता उर्फी जावेदनेही या घटनेला वेगळ्या पद्धतीने विरोध केला आहे.