मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : निष्ठावंत शिवसैनिक निखाऱ्यासारखे, तेच उद्या मशाली पेटवतील: उद्धव ठाकरे

Video : निष्ठावंत शिवसैनिक निखाऱ्यासारखे, तेच उद्या मशाली पेटवतील: उद्धव ठाकरे

Jan 26, 2023 06:39 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jan 26, 2023 06:39 PM IST

Uddhav Thackeray Thane Speech Video : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच ठाणे शहराचा दौरा केला. शिवसैनिक जोरदार घोषणांसह उद्धव यांचं स्वागत केलं. ठाणे शहर व जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात उद्धव यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. 'निष्ठेच्या पांघरुणाखाली घुसलेले लांडगे विकले गेले आहेत. आता आमच्यासोबत निष्ठावंत निखारे आहेत. या निखाऱ्यांतूनच उद्या मशाली पेटतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp