मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संपली. शेवटच्या सभेत लालबाग येथील काळाचौकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेत आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालतील, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं.