मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Uddhav Thackeray Video : 'जय भवानी' हा शब्द गीतातून काढणार नाही; उद्धव ठाकरे कडाडले!

Uddhav Thackeray Video : 'जय भवानी' हा शब्द गीतातून काढणार नाही; उद्धव ठाकरे कडाडले!

Apr 22, 2024 12:55 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 22, 2024 12:55 PM IST

Uddhav Thackeray Video : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचं निवडणूक चिन्ह मशाल या गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी या शब्दांना निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला आहे. हे दोन शब्द गीतातून वगळावे अशी नोटीस निवडणूक आयोगानं शिवसेनेला पाठवली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या या आक्षेपाला जाहीर उत्तर दिलं. 'जय भवानी' हे आमचं कुलदैवत आहे. शिवसेनेच्या गीतातून हा शब्द वगळणार नाही. तुम्हाला आमच्यावर कारवाई करायची असेल तर आधी बजरंग बलीच्या नावानं मत मागणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर कारवाई करा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp