Akshaya Deodhar On Cervical Cancer: सध्याच्या घडीला महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. यातच सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. मात्र, यासारख्या घटक आजारांपासून आपल्याला दूर ठेवणारी एचपीव्ही लस आता सगळीकडे उपलब्ध आहे. मात्र, याबद्दल आजही अनेक स्त्रियांना माहिती नाही. महिलांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीच अक्षया देवधर हिने स्वतः ही लस घेऊन व्हिडीओ पोस्ट केला आहे.