Tu Jhoothi Main Makkaar Review: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा 'तू झुठी मैं मक्कार' हा चित्रपट होळी आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. या बॉलिवूड चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला देखील जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता प्रेक्षक देखील हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकंदरीत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.