Pune truck video : पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र शुक्रवारी शहरातील समाधान चौक परिसरात एक अजब घटना घडली. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात भला मोठा खड्डा पडला व यात अख्खा ट्रक व दोन दुचाकी खड्ड्यात कोसळल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.