Titeeksha Tawde and Siddharth Bodke: अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा लग्न सोहळा काल म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी पार पडला आहे. आता त्यांच्या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातीलच एक व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. या व्हिडीओमध्ये लग्न लागताच तितीक्षा डोळ्यात पाणी आलेलं बघायला मिळालं आहे.