April Fool Day: सध्या टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार त्यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान टायगरने अक्षय कुमारसोबत एप्रिल फूल प्रँक केला आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.