Thyroid Awareness Month: थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते. मेंदू, हृदय, स्नायू व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी हे हार्मोन्स आवश्यक असतात. थायरॉइड ग्रंथी शरीरासाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सची निर्मिती करू शकली नाही तर त्याला हायपोथायरॉइडिझम असे म्हणतात. थायरॉइड ग्रंथी अति-क्रियाशील असली तर हायपर थायरॉइडिझम होतो. हायपरथायरॉईडीझममुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीत अनियमितता, कमकुवत प्रजनन क्षमता आणि अकाली प्रसुतीचा धोका उद्भवतो. तर पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या संख्येत लक्षणीय घट होऊ शकते.