Pune Kharadi Bus Burning : खराडीत शाळेतील विद्यार्थांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवून नागरिकांच्या मदतीने तात्काळ १५ विद्यार्थ्यांना खाली उतरविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. काही क्षणातच बस आगीत जळून खाक झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.