Ye Re Ye Re Paisa 3: ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटांनी यापूर्वी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं होतं. पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या कथासूत्रावर हे चित्रपट बेतलेले होते. आता आधीच्या दोन चित्रपटांतलं कथानक आणि त्या धमाल व्यक्तिरेखा आता तिसऱ्या भागात काय धमाल करणार याची उत्सुकता चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच निर्माण झाली आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला आहे.