Shankar Mahadevan Grammys 2024: संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ग्रॅमी २०२४’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यात गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. ग्रॅमी पुरस्कार स्वीकारताना शंकर महादेवन यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, ‘मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. हे आमचे टीम वर्क आहे. सगळ्यांच्या सोबतीशिवाय इतकी मोठी गोष्ट घडत नाही. आमचे टीम बॉडिंग देखील कौतुकास्पद होते. मी माझे मित्र, कुटुंब आणि देवाचे खूप खूप आभार मानतो.’